तुम्ही टिव्ही तर पाहतच असाल. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, कार्यक्रमादरम्यान थोड्या थोड्या कालावधीनंतर टिव्हीच्या स्क्रीनवर काही नंबर दिसतात. हे नंबर पुर्ण स्क्रीनवर फिरतात. कार्यक्रम अथवा क्रिकेट सामना सुरू असताना हे नंबर मध्येच आल्याने त्रास होतो. हे नंबर का दिसतातया तुम्ही कधी विचार केला आहे ?

हे नंबर सेटटॉप बॉक्समुळे आपल्या टिव्ही स्क्रीनवर दिसत असतात. हे नंबर्समुळे पायरेसी रोखण्यास प्रमुख भूमिका बजावतात. या नंबरमुळेच चॅनेलच्या टीआरपीची देखील माहिती मिळते व कितीजण कार्यक्रम पाहत आहेत ते समजते.
अनेकदा, एखाद्या कारणामुळे लोक त्यांचा आवडता कार्यक्रम पाहू शकत नाहीत. अशावेळेस तो कार्यक्रम ते रेकॉर्ड करून ठेवतात. तर काहीजण लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असतानाच तो कार्यक्रम युट्यूबवर अपलोड करतात, यालाच पायरेसी म्हणतात.
हीच पायरेसी रोखण्यासाठी हे नंबर्स असतात. एखाद्या व्यक्तीने लाईव्ह सामना अथवा कार्यक्रम रेकॉर्ड केल्यावर हे नंबर देखील रेकॉर्ड होतील. याच नंबर्सच्या मदतीने त्या व्यक्तीपर्यंत पोहचता येते. कारण प्रत्येक सेटटॉप बॉक्ससाठी नंबर वेगळे असतात. यानंतर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.