जोडप्याने चुकीने कचऱ्यात फेकले 14 लाख रुपये, पुढे काय झाले बघाच

इंग्लंडच्या बनहँम-ऑन-सी येथील एका जोडप्याने एका नातेवाईकच्या मृत्यूनंतर घराची सफाई केली. सफाई करताना घरात अनेक जुने डब्बे होते. जोडप्याने हे सर्व डब्बे मिडसोमेर नॉर्टमच्या रिसायकलिंग सेंटरला दिले. सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी रिसायकल करण्याआधी डब्बे तपासले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण त्यातील एका डब्बात तब्बल 15 हजार पाउंड (जवळपास 14 लाख रुपये) होते.

यानंतर सेंटरच्या कर्मचाऱ्याने इमानदारी दाखवत पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सेंटरच्या सीसीटिव्हीच्या आधारावर कारचा नंबर घेतला व जोडप्याच्या घरी पोहचले. चौकशी केल्यावर जोडप्याने सांगितले की, हे पैसे त्यांच्याच नातेवाईकाचे होते. त्यांना डब्ब्यात पैसे जमा करण्याची सवय होती. सत्यता तपासल्यानंतर पोलिसांनी जोडप्याला रक्कम परत केली.

Christmas may have been better than expected for a Burnham-on-Sea couple, thanks to staff at a Bath and North East…

Posted by Avon and Somerset Police on Friday, December 27, 2019

जोडप्याला पैसे परत केल्यानंतर पोलिसांनी रिसायकल सेंटरवरील कर्मचाऱ्याला देखील धन्यवाद म्हटले. या घटनेची माहिती पोलिसांनी फेसबुक पोस्टमध्ये दिली. कर्मचाऱ्याच्या ईमानदारीशिवाय मालकाला आपल्या पैशांबद्दल कधीच समजले नसते आणि पोलीस देखील खऱ्या मालकापर्यंत पैसे पोहचवू शकले नसते.

Leave a Comment