… म्हणून अमेरिकेतील चीनच्या वैज्ञानिकांची होत आहे घरवापसी

चीनचे वैज्ञानिक आणि संशोधक देशाला विज्ञानाचे पॉवर हाऊस बनविण्यासाठी अमेरिका आणि जगातील अन्य देशातून मायदेशात परतत आहेत. अमेरिकेच्या ओहियो युनिवर्सिटीच्या संशोधकांनुसार, 16,000 पेक्षा अधिक प्रशिक्षित चीनी वैज्ञानिक देशात परतले आहेत.

2017 मध्ये ही संख्या 4500 होती, जे 2010 च्या तुलनेत दुप्पट आहे. चीनने आपल्या वैज्ञानिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी दरवाजे उघडले असल्याने हे शक्य झाले आहे. सोबतच परदेशात मिळणारी सर्व मूलभूत सुविधा देण्यात येणार असल्याचा विश्वास दिला आहे. आशियातून अमेरिकेला जाणाऱ्या वैज्ञानिक आणि इंजिनिअर्समध्ये सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे. अमेरिकेतील 29.60 लाख आशियाई वैज्ञानिक-इंजिनिअर्समध्ये 9.50 लाख भारतीय आहेत.

ओहियो यूनिवर्सिटीच्या जॉन ग्लेन कॉलेज ऑफ पब्लिक अफेअर्सच्या असोसिएट प्रोफेसर कॅरोलिन वॅगनर यांच्यानुसार, चीनच्या वैज्ञानिकांनी या प्रकारे जाणे चिंताजनक आहे. यामुळे वैज्ञानिक प्रणालीवर गंभीर परिणाम होतील. चीनने विज्ञानाच्या अनेक क्षेत्रात प्रभुत्व मिळवले आहे. खासकरून आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मेटेरिअल सायन्समध्ये जगात त्याला कोणी उत्तर देणारे नाही.

चीनी वैज्ञानिक मायदेशात परतण्यामागे बजेट मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. चीन सरकारने 10 पट अधिक बजेट वाढवले आहे. चीनने रिसर्चवर 2019 मध्ये 3,75,000 कोटी रुपये खर्च केले. मात्र अमेरिकेच्या तुलनेत ही रक्कम खूपच कमी आहे.

Leave a Comment