सॅमसंग सीईएस 2020 मध्ये जगातील पहिला ट्रू बेझल लेस अर्थात फ्रेमलेस टिव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र लाँचिंग अधिकच या फ्रेमलेस 8के टिव्हीचे कथित फोटो लीक झाले आहेत.
या फोटोमध्ये दिसत आहे की, टिव्हीच्या बाजूला कोणतेच बेझल्स (कडा) नाहीत. मात्र खालच्या बाजूला बेझल्स दिसत आहेत. फोटोमध्ये नो गॅप वॉलमाउंट देखील दिसत आहे.
हा फोटो जर्मन वेबसाईट 4KFilme द्वारे समोर आला आहे. या फ्रेमलेस 8के टिव्हीचे डिझाईन सॅमसंग वॉल टिव्हीवरून घेतल्याचे दिसत आहे. सध्या सॅमसंगकडून या टिव्हीबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा टिव्ही Q900T अथवा Q950T नावाने बाजारात लाँच केला जाऊ शकतो.
सांगण्यात येत आहे की, सॅमसंगच्या पहिल्या फ्रेमलेस 8के टिव्हीमध्ये इन-हाउस वन कनेक्ट बॉक्स डिझाईन मिळेल. ते बिल्ट-इन टिव्ही ट्यूनरसोबत मीडिया रिसिव्हरचे काम करेल. या टिव्हीबरोबरच CES 2020 मध्ये अनेक 4के टिव्ही मॉडेल्स लाँच केले जाणार आहेत.
सॅमसंगने 8के टिव्हीच्या सर्टिफिकेशन प्रोग्राम लाँच करण्यासाठी 8के असोसिएशनसोबत भागिदारी केली आहे. कोणत्याही कंपनीच्या प्रोडक्टला 8के टिव्ही म्हणून सर्टिफिकेट मिळविण्यासाठी कमीत कमी 7,680 x 4,320 पिक्सल पॅनल रिझोल्यूशन, 600 nits पेक्षा अधिक पिक ब्रायटनेस, HDMI2.1 स्टँडर्डवर इमेज ट्रांसमिशन आणि HVEC सपोर्टचा समावेश आहे.