अरेच्चा ! हा 11 वर्षांचा मुलगा 100 किलो वजनासह करतो डेडलिफ्ट

रशियाच्या 11 वर्षीय टिमोफे क्लेवेकिन या मुलाने 100 किलो वजनासह डेडलिफ्ट करण्याची कामगिरी केली आहे. तो वयाच्या 6व्या वर्षापासून वेटलिफ्टिंगची ट्रेनिंग घेत आहे. टिमोफे 105 किलोमध्ये राष्ट्रीय विक्रमाच्या तयारीत आहे.

टिमोफेचे वडील आर्सेने शाल्या गावातील जिममध्ये बॉडी बनविणाऱ्या प्रशिक्षण देतात. त्यांना बघूनच टिमोफेच्या मनाच बॉडी बनविण्याचा विचार आला व वडिलांनी त्याला यासाठी मदत केली.

सहा वर्षांचा असताना त्याने सर्वात प्रथम स्थानिक स्पर्धेत भाग घेतला होता, जेथे त्याने 55 किलो वजनासह डेडलिफ्टिंग केले. 11 वर्ष वय आणि 38 किलो वजन असलेला टिमोफे डेडलिफ्टिंग करताना अनेकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतो. वेटलिफ्टिंगसोबतच त्याने अनेकदा बेल्टसोबत ट्रॅक्टर आणि कार ओढण्याची कामगिरी देखील केलेली आहे.

टिमोफे यांच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाचे वैशिष्ट्यच हे आहे की त्याला माहिती आहे चॅम्पियन बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. जेव्हा त्याचे मित्र खेळण्यात व्यस्त असतात, त्यावेळी तो आठवड्यातून 3-4 दिवस जिम करत असतो. त्याची आई व चाइल्ड डेव्हलपमेंट तज्ञ आम्हाला अनेकदा म्हणाले की, त्याच्या ट्रेनिंगचा परिणाम त्याच्या गुडघ्यांवर आणि मणक्यावर होईल. मात्र मी त्याची काळजी घेतो, कारण त्याच्या ट्रेनरसोबतच मी त्याचा वडील देखील आहे. मी असे काहीही करणार नाही ज्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होईल.

 

Leave a Comment