मॉस्कोत नवीन वर्ष स्वागताला रस्त्यावर कृत्रिम बर्फ


रशियात डिसेम्बर महिन्यात प्रचंड हिमवृष्टी होते आणि त्यामुळे तेथे नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत लोक थंडीने कुडकुडत असतानाच करतात. यावेळी रस्त्यांवर इतके प्रचंड बर्फ असते की लोकांना चर्च मध्ये जाता यावे आणि रस्त्यावर नवीन वर्ष साजरे करण्याचा आनंद लुटता यावा म्हणून लाखो डॉलर्स खर्च करून बर्फ हटविले जाते.

यंदा मात्र रशियात विशेषतः मॉस्को मधील लोकांना नाताळ आणि नववर्षाचा वेगळाच अनुभव आला आहे. यंदा १३४ वर्षात प्रथमच मॉस्को मध्ये तापमान ७ डिग्रीवर गेल्याने बर्फाचा कुठेच मागमूस राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांना शहरातील नाताळचे वातावरण दरवर्षी प्रमाणे वाटावे म्हणून रेड स्क्वेअर आणि तेवरकाया स्ट्रीटवर चक्क कृत्रिम बर्फ आणून पसरला गेला आहे. व्यापार सेवा विभाग प्रमुख अॅलेक्सी यांनी या संदर्भात मिडीयाशी बोलताना स्नो बोर्ड रिंग मधून बर्फ आणून तो रस्त्यांवर पसरविला गेल्याचे सांगितले.

यापूर्वी १८८६ मध्ये एकदा असेच तापमान ५.३ डिग्रीवर गेले होते त्यानंतर प्रथमच तापमान इतके वाढले आहे. हवामान रिसर्च सेंटरकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार १८ ते २५ डिसेंबर या काळात तापमान २ ते ७ डिग्री राहण्याची शक्यता होती. मॉस्को मध्ये डिसेंबर मध्ये शहरावर बर्फाची पूर्ण चादर असते आणि बर्फ हटविण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो.

Leave a Comment