हनिमूनचा स्वर्ग- तिकेहौ आयलंड


सोर्स, पिंटरनेट
दूरपर्यंत पसरलेला निळा सागर, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या वाळूचे विशाल किनारे, माणसांची वर्दळ जवळजवळ नाहीच म्हणावी अशी गर्दी, अपार शांतता, वर्तणुकीवर कोणतीही बंधने नाहीत अशी जागा म्हणजे प्रेमी युगुलांना स्वर्गासारखीच वाटणार. अशी जागा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे आणि तिचे नाव आहे फ्रेंच पोलीनेशिया मधील तीकेहौ बेट. दक्षिण प्रशांत महासागरात असलेल्या या आयलंडला म्हणूनच हनिमूनचा स्वर्ग असे सार्थ नाव दिले गेले आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठे सेक्सी ठिकाण अशीही त्याची ओळख आहे.


वास्तविक ताकेहौ याचा अर्थ आहे पीसफुल. येथे दुरवर पसरलेले सफेद आणि गुलाबी वाळूचे स्वच्छ आणि सुंदर किनारे आहेत आणि त्यावर नारळीची बने आहेत. येथे जेमतेम ५०० लोक वस्तीला आहेत आणि रिसोर्टसुद्धा हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही खूप नाही. त्यामुळे हवा तेवढा एकांत मिळू शकतो. हे प्रत्यक्षात एक प्रवाळबेट आहे. या बेटावरचे लगुन नैसर्गिक जलतरण तलावाप्रमाणे वाटते.


या लगूनची लांबी २५ किमी असून खोली ३० आहे. येथे अनेक प्रकारचे समुद्री जीव पाहायला मिळतात. येथे कयाकिंग, स्नोर्केलिंग, बायकिंगची मौज लुटता येते तसेच डायविंग सेंटरही आहे. वॉटरस्पोर्टच्या शौकिनांना येथे मजा लुटण्याची पुरेपूर संधी आहे. येते राजधानी पापिते पासून वन स्टॉप फ्लाईट येते. या बेटावरचे मुख्य गाव तुहेराहेर मध्ये छोटा विमानतळ आहे.

Leave a Comment