या हेअरस्टाईल ट्राय करून पाहणार?


प्रत्येक माणसाला आपण वेगळे, उठावदार दिसावे अशी इच्छा असते. विविध प्रकारचे कपडे, मेकअप, दागिने, हेअरस्टाईल अशा विविध मार्गांनी माणूस आपली ही इच्छा जपत असतो. आकर्षक दिसणे हा आणखी एक त्यातलाच प्रकार. माणसाच्या व्यक्तीमत्त्वात त्याचे केस महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या केसांच्या विविध स्टाईल करूनही माणूस बाकीच्यांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करत असतो. सर्वसाधारणपणे असे दिसते, की सेलिब्रिटींसारख्या हेअरस्टाईल करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जात असते. मात्र या आकर्षक दिसण्याच्या हट्टापायी अशाही कांही हेअरस्टाईल केल्या जातात की त्यामुळे माणूस हास्यास्पद दिसतो.

भारतातही आजकाल हेअरस्टाईलकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. अनेक हेअरड्रेसर त्यासाठी भलीभक्कम किंमत आकारून विविध आकाराच्या हेअरस्टाईल करून देतात. केस चांगले काळेभोर व घनदाट दिसावेत यासाठी अनेक उपाय योजले जात असतातच पण थोडेफार टक्कल पङू लागले तर माणसे चिंताग्रस्त होतात कारण केसांमुळे मिळणारे सौंदर्य कमी होणार अशी त्यामागे भीती असते. येथे कांही विचित्र व अनोख्या हेअरस्टाईल्सचे फोटो देत आहोत. तुम्हाला त्या ट्राय करायच्या असतील तर करू शकता.


हेलिकॉप्टर स्टाईल- यामध्ये केसांची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की त्यातून हेलिकॉप्टरचा भास व्हावा.


प्रत्येक पदार्थांवर किंमतीच्या जागी छापला जाणारा बारकोड आपल्या परिचयाचा आहे. ही अनोखी हेअरस्टाईल बारकोड हेअरस्टाईल म्हणून ओळखली जाते.


आपल्याला विविध फळे आवडतात. त्यातील ही अननस हेअरस्टाईल कशी वाटतेय?


टोमॅटोचा रंग व चव अनेकांना भुरळ घालते. मग हा टोमॅटोच हेअरस्टाईलमध्येही वापरता आला पाहिजे ना! म्हणून ही हेअरस्टाईल


वर फोटोत दिसत असलेल्या हेअरस्टाईला तुम्हीच नांव द्या आणि आम्हालाही कळवा.

Leave a Comment