म्हणून १ जानेवारीला टीम इंडिया खेळत नाही मॅच


नवीन वर्षात टीम इंडियासाठी भरगच्च कार्यक्रम आखला गेला आहे. त्याची सुरवात ५ जानेवारी पासून श्रीलंकेविरोधातील टी २० सिरीजने होत आहे. टीम इंडियाने आजपर्यंत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला एकही टी २० सामना खेळलेला नाही. मात्र एक वनडे सामना खेळला होता आणि त्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. यामुळे टीम इंडिया नव वर्षाच्या प्रथम दिवशी सामना खेळण्याचे टाळते असे मजेने म्हटले जाते.

२००३ मध्ये टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर सात सामने सिरीज खेळण्यासाठी गेली होती तेव्हा त्यातील तिसरा सामना ख्राईस्टचर्च येथे १ जानेवारीला झाला होता. त्यावेळी टीम इंडियाचा कप्तान होता सौरव गांगुली. त्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती पण त्याचा निर्णय साफ चुकला आणि भारताची फारच बुरी हालत झाली. वीरेंद्र सेहवाग आणि सौरव ओपनिंगला आले पण भारताला मोठा धावफलक रचता आला नाही. सर्व टीम ४१.४ ओव्हर मध्ये १०८ रन्स काढून बाद झाली. त्यावेळी राहुल द्रविडने २० रन्स केल्या होत्या तर २२ रन्स एक्स्ट्रा मिळाल्या होत्या.

अर्थात न्यूझीलंडलाही फलंदाजी फार सोपी गेली नाही. सुरवातीच्या पडझडीनंतर मात्र त्यांनी खेळ सावरला आणि पाच विकेट राखून सामना जिंकला होता.

Leave a Comment