नव्या वर्षात बाजारात फोल्डेबल फोन्सचा दबदबा राहणार


नव्या २०२० सालात भारतात स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढणार असल्याचे संकेत मिळत असतानाच या वर्षात बाजारात फोल्डेबल फोन्सचा दबदबा राहील असे दिसून आले आहे. स्मार्टफोन क्षेत्रातील सर्व बड्या कंपन्या या सेगमेंट मधील त्यांच्या मोबाईल्सची झलक दाखवू लागल्या आहेत हे त्याचे निदर्शक मानले जात आहे.

कोरियन जायंट सॅमसंग ने त्यांच्या गॅलेक्सी फोल्डची घोषणा केली असून फोल्ड केल्यावर या फोनचा स्क्रीन ४.६ इंची होणार आहे. पूर्ण स्क्रीन ७.३ इंची आहे. हा फोन आकाराने मोठा आणि चौकोनी असून त्याचा वापर फोन आणि टॅब्लेट अश्या दोन्ही प्रकारे करता येणार आहे. या फोनला प्रथमच १२ जीबी रॅम दिली गेली आहे.

मोटोरोला त्यांचा राझर फोल्डेबल फोन या वर्षात बाजारात आणत आहे. चार वर्षाच्या संशोधनातून तो विकसित केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्याचा प्रोटोटाईप तयार असून या फोनला १५ एमपीचा कॅमेरा दिला जात आहे. हुवाई मेट एक्स फोन या स्पर्धेत आहे. हा फोन चीन मध्ये लाँच केला गेला आहे मात्र भारतासह जगभरात तो या वर्षात सादर होईल. या फोनचा बिना फोल्ड स्क्रीन ८ इंची असून फोल्ड नंतर तो ६.६ इंची होतो. स्क्रीन पूर्ण उघडल्यावरही मध्ये गॅप राहत नाही. या फोनची जाडी फक्त ११ एमएम आहे.

चीनी कंपनी ओप्पो फोल्डेबल फोनच्या स्पर्धेत असून त्यानीही स्क्रीनच्या बाजूने फोल्ड होणारा फोन तयार केला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो बाजारात येईल. मायक्रोसॉफ्टने सरफेस ड्युओ बाजारात आणला जात असल्याची घोषणा २०१९ मध्येच केली होती. हा फोन ९ इंची स्क्रीनचा असून तो एखाद्या पुस्तकाप्रमाणे दिसतो असे फोटोवरून लक्षात आले आहे.

Leave a Comment