
चीनने 56,496 कोटी रुपये खर्च करून जगातील पहिली स्मार्ट आणि हायस्पीड रेल्वे सुरू केली आहे. ही रेल्वे ड्रायव्हरलेस (चालकविरहित) आहे. 350 किमी वेगाने धावणाऱ्या या रेल्वेमध्ये 5 जी नेटवर्क, वायरलेस चार्जिंग आणि स्मार्ट लायटिंगसह प्रत्येक गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे जोडलेली आहे. सोमवारी बिजिंग ते झांगजियाकौ हे 174 किमीचे अंतर रेल्वेने 10 स्टॉपसह 47 मिनिटात पुर्ण केले.

या रेल्वेची सर्वात खास गोष्ट म्हणजे याच्या संचालनामध्ये वापरण्यात येणारी प्रत्येक तंत्रज्ञान हे चीनमध्ये तयार झालेले आहे. या रेल्वेला खास करून 2022 मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी सुरू करण्यात आले आहे. कारण या दोन शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.
चीनने दावा केला आहे की, ही जगातील पहिली ड्रायव्हरलेस स्मार्ट हायस्पीड रेल्वे आहे. ही रेल्वे चालवण्यासाठी कोणत्याही ऑपरेटरची गरज नाही. केवळ एक व्यक्ती ड्रायव्हर बोर्डवर असेल जो आपतकालिन स्थितीवर लक्ष ठेवेल. या रेल्वेला मेंटेन आणि रिपेअरिंगचे काम देखील रोबोट करतील.

चीन रेल्वे सेवेंथ ग्रुप परियोजनेचे इंजिनिअर दि केमेंग म्हणाले की, या रेल्वेसाठी या मार्गावरील ट्रॅक आणि मशिन्स पुर्णपणे बदलण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या आत व सर्व स्थानकांवर रोबोट सेवा देत आहेत. चीनचे रेल्वे नेटवर्क हे 1,39,000 किमीचे आहे.