भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा


कोलंबो – रविवारपासून टीम इंडिया विरुद्ध सुरु होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या संघात अँजेलो मॅथ्यूजचे पुनरागमन झाले आहे, तर वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपला दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले आहे. शेहान जयसूर्या याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे.

5 जानेवारीपासून भारतविरुद्ध मालिकेला श्रीलंकेचा संघ लसिथ मलिंगा याच्या नेतृत्वात सुरुवात करणार आहे. 18 महिन्यांनंतर टी-20 संघात परतलेल्या मॅथ्यूजच्या अनुभवाचा श्रीलंकेच्या संघातील युवा खेळाडूंना फायदा होईल. श्रीलंकेची टी -20 मध्ये भारताविरुद्ध कामगिरी चांगली राहिली नाही. आतापर्यंत या दोघांमध्ये 6 द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यामध्ये 5 मध्ये भारताने विजय विजय मिळवला, तर एक मालिका बरोबरीत राहिली. म्हणजेच श्रीलंकेचा संघ आतापर्यंत मालिका जिंकू शकलेला नाही.

तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना 5 जानेवारीला गुवाहाटीमध्ये खेळला जाईल. मालिकेचा दुसरा सामना 7 जानेवारी रोजी खेळला जाईल. मालिकेचा शेवटचा सामना 10 जानेवारी रोजी खेळला जाईल. पहिला सामना गुवाहाटीच्या मैदानावर, दुसरा सामना इंदोर आणि तिसरा सामना पुणेच्या स्टेडियममध्ये खेळला जाईल. त्याचबरोबर मालिकेतील तिन्ही सामने जर भारतीय संघाने जिंकले तर श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 14 सामने जिंकणारा पहिला संघ बनेल.

श्रीलंका संघ: लसिथ मलिंगा (कर्णधार), कुसल परेरा, दनुष्का गुणथिलाका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, ओशादा फर्नांडो, दासुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, वनिंदू हसरंगा, लक्षन संदकन, धनंजया डी सिल्वा, लाहिरू कुमारा, ईसूरु उदाना.

Leave a Comment