रॉयल एनफिल्ड या नावाने लाँच करू शकते दोन नवीन बाईक्स

Image Credited – India Car News

रॉयल एनफिल्ड आपल्या बाईक्सला बीएस6 व्हर्जनमध्ये आणण्यासाठी काम करत आहे. यासोबत कंपनी काही नवीन बाईक्स देखील आणण्याच्या तयारीत आहेत.

रॉयल एनफिल्डने काही दिवसांपुर्वीच शेर्पा (Sherpa) आणि हंटर (Hunter) नाव ट्रेडमार्क केले आहे. ही नावे ट्रेडमार्क केल्यानंतर सांगण्यात येत आहे की, कंपनी शेर्पा आणि हंटर नावाच्या दोन बाईक लाँच करू शकते. या दोन्ही बाईक कंपनीच्या एंट्री लेव्हल मॉडेल असतील.

रॉयल एनफिल्डने 1960 च्या दशकात शेर्पा नावाने बाईक लाँच केली होती. ही 173सीसीची बाईक होती. नंतर या बाईकला मॉडिफायकरून 1970 मध्ये Crusader नावाने लाँच केली होती. या दोन नावांव्यतरिक्त कंपनीने काही दिवसांपुर्वी Meteor आणि Explorer नावे देखील ट्रेडमार्क केली होती.

रिपोर्टनुसार, कंपनी 2020 च्या पहिल्या तिमाहीत एक्सप्लोरर अथवा हंटर नावाने एक हल्की मोटारसायकल लाँच करू शकते. ही एक रोडस्टर स्टाइल बाईक असेल. याचे सीट खाली असतील व वजन देखील कमी असेल, जेणेकरून महिला आणि युवकांना सांभाळण्यास सोपे जाईल.

Leave a Comment