माल्ल्याची संपत्ती विकून होणार कर्जाची वसूली


नवी दिल्ली: हजारो कोटींना भारतीय बँकांना चूना लावून फरार झालेल्या उद्योगपती विजय माल्ल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार दणका बसला आहे. एसबीआयसह अनेक बँकांना पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने विजय माल्ल्याची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून विकण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे माल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव कधीही होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

या वसुलीवर काहीच आक्षेप नसल्याचे न्यायालयाला ईडीनेही सांगितल्यामुळेही न्यायालयाने माल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करण्याची बँकांना परवानगी दिली आहे. दरम्यान, याबाबतचा निर्णय डेट रिकव्हरी ट्रिब्यूनलच घेऊ शकतो, असे माल्ल्याच्या वकिलांनी आक्षेप घेताना म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयात माल्ल्याने अपील करावे म्हणून विशेष न्यायालयाने त्यावर १८ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली होती. त्यावर विशेष न्यायालयाने आता हा निर्णय दिला असून माल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे.

Leave a Comment