नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी होणार एवढ्या बाळांचा जन्म

Image Credited – tyla

नवीन वर्ष आणि नवीन दशकाच्या सुरूवातीला यूनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरिटा यांनी पहिल्याच दिवशी जन्माला येणाऱ्या बाळांचे शक्यता असलेले 1 कँलेंडर जारी केले आहे. यूनिसेफने 1 जानेवारी 2020 ला जन्माला येणाऱ्या बाळांची अंदाजे संख्या सांगितली आहे. रिपोर्टनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात 3,92,078 बाळं जन्माला येतील.

यात सर्वाधिक 67,385 बाळांचा जन्म भारतात होईल. दुसऱ्या क्रमांकावर चीन असून, तेथे 46,299 बाळांचा जन्म होईल. दावा करण्यात आला आहे की, 2020 च्या पहिल्या दिवशी पहिले बाळ फिज्जीमध्ये जन्मले व शेवटचे अमेरिकेत जन्मेल.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतात-67,385,चीन – 46,299, नायझेरिया – 26,039, पाकिस्तान – 16,787, इंडोनेशिया – 13,020 अमेरिका – 10,452, कांगो – 10,247, इथियोपिया – 8,493 बाळांचा जन्म होईल.

यूनिसेफनुसार, मागील 30 वर्षात बाळ जन्माला येणे व जिंवत राहण्याचे प्रमाण सुधारले आहे.

Leave a Comment