दिल्लीच्या या गायकाला ओबामांनी दिले खास गिफ्ट

Image Credited – Navbharat Times

एखाद्या देशाच्या राष्ट्रपती अथवा पंतप्रधानाला आपले गाणे आवडावे यासारखी मोठी गोष्ट एखाद्या गायकासाठी काय असेल. दिल्लीचा गायक प्रतीक कुहडला असेच एक खास गिफ्ट 2019 मध्ये मिळाले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी 2019 मधील त्यांच्या आवडत्या गाण्यांची यादी शेअर केली आहे. या यादीमध्ये प्रतीक कुहडचे गाणे ‘कोल्ड/मेस’चा देखील समावेश आहे.

ओबामांना हे गाणे आवडणे प्रतीकसाठी नक्कीच मोठे गिफ्ट आहे. बराक ओबामांचे ट्विट रिट्विट करत प्रतिकने लिहिले की, हे खरचं झाले आहे आणि मला वाटत नाही मी आज रात्री झोपू शकेल. मला माहित नही कोल्ड/मेस हे गाणे त्यांच्यापर्यंत कसे पोहचले. मात्र बराक ओबामा धन्यवाद, धन्यवाद युनिवर्स. मला वाटत होते की, 2019 यापेक्षा अधिक चांगले असू शकत नाही. मात्र मी चुकीचा होता. ही सन्मानाची गोष्ट आहे.

प्रतीकचा जन्म हा जयपूरमध्ये झाला असून, 16 वर्षांचा असतानाच त्याने गिटार वाजवणे आणि गाणे लिहिण्यास सुरूवात केली. त्याने न्युयॉर्क युनिवर्सिटीमधून देखील अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. तेथून परतल्यावर त्याने दिल्लीतून काम करण्यास सुरूवात केले व संगीताच्या जगात करिअरची सुरूवात केली.

प्रतीकचे आतापर्यंत अनेक म्यूझिक अल्बम आले आहेत. यामध्ये ‘In Tokens and Charms’, ‘रात राज़ी’ यांचा समावेश आहे. 2018 मध्ये त्याचे ‘Cold/Mess’ गाणे रिलीज झाले होते.

त्याने हिंदी चित्रपटात देखील गाणी गायली आहेत. 2016 मध्ये आलेल्या ‘बार बार देखो’मधील ‘खो गए हम कहां’ गाणे त्याने लिहिले व गायले होते. तर 2018 मधील ‘कारवां’ चित्रपटातील ‘सांसें’ आणि ‘कदम’ ही गाणे त्याने कंपोज केली होती.

प्रतीकने आतापर्यंत 32 गाणी गायली अथवा कंपोज केली आहेत. वर्ष 2019 मध्ये त्याला iTunes आणि Spotify कडून ‘इंडियन इंडी अल्‍बम ऑफ द ईअर’ पुरस्कार मिळाला. 2016 मध्ये एमटिव्ही यूरोज म्यूझिक अवॉर्ड्समध्ये त्याला ‘बेस्‍ट इंडियन इंडी हिट्स’ चा सन्मान मिळाला. त्याचवर्षी एका आंतरराष्ट्रीय गाणे लिहिण्याच्या स्पर्धेत प्रथम स्थान मिळवले.

Leave a Comment