
काही दिवसांपुर्वीच हवेत उडणाऱ्या कारचा प्रोटोटाइप समोर आला होता. आता हवेत उडणाऱ्या एका बाईकचा प्रोटोटाइप समोर आला आहे. ही बाईक होव्हर बाईकमध्ये बदलते.
फ्रेंच कंपनी लॅझरेथने (Lazareth) एक खास बाईक लॅझरेथ एलएमव्ही 496 तयार केली आहे. जी हवेत देखील उडू शकते. यामध्ये इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. हवेत उडण्यासाठी या बाईकमध्ये जेट प्रोपज्लन इंजिन आहेत, जे याला 10 मिनिटे उडण्याची क्षमता देतात.

एलएमव्ही 496 बाईकमध्ये लावलेले जेट इंजिन विमानातील जेट इंजिनप्रमाणे आहेत. यामध्ये ऑनबोर्ड केरोसीन फ्यूल टँक देण्यात आला आहे. कंपनीने सुरूवातीला याचे केवळ 5 प्रोटोटाइप बनवले आहेत. हे प्रोटोटाइप कोणीही खरेदी करू शकते. ही बाईक कोणीही चालवू शकते. याचे ब्रेक्रिंग सिस्टम आणि अंडरकॅरेज टेक्नोलॉजी दुसऱ्या लॅझरेथ गाड्यांपासून घेण्यात आली आहे. यामध्ये टीएफएक्स सस्पेंशन टेक्नोलॉजी देखील देण्यात आली आहे.

बाईकमध्ये लावलेले 4 जेट इंजिन जवळपास 1300 हॉर्सपॉवर देतात. यामध्ये ऑल्टीट्यूड, स्पीड, फ्यूल लेव्हल, पोझिशन, डायरेक्शन या सर्व गोष्टी डॅशबोर्डवर दिसतात. बाईकचे वजन कमी ठेवण्यासाठी याची बॉडी केव्लर कार्बनपासून बनविण्यात आली आहे.

बाईकमधील इलेक्ट्रिक मोटर फूलचार्ज केल्यानंतर 100 किमीपर्यंत चालू शकते. तसेच, बाईक हवेत असल्यास इलेक्ट्रिक मोटरचा वापर होत नाही. या बाईकचे वजन केवळ 140 किग्रा आहे. याच्या जेटकॅटमध्ये टर्बोइन लावण्यात आलेले आहेत. हवेमध्ये उडत असताना या बाईकला जॉयस्टीक अथवा हँडबारने कंट्रोल केले जाते.

ही बाईक जमिनीपासून 3.3 फूट उंच उडू शकते. हे जास्त अंतर नाही. मात्र भविष्यात कंपनी अधिक उंच उडणारी बाईक बनवणार आहे. या बाईकच्या किंमतीबद्दल सांगायचे तर याची किंमत 3,80,000 पाउंड म्हणजेच जवळपास 3.60 कोटी रुपये आहे.