या 18 वर्षीय मुलीने सर केले अंटार्कटिकाचे सर्वात उंच शिखर

Image Credited – Amarujala

वयाच्या केवळ 13 व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या मालावथ पूर्णाने आणखी नवी कामगिरी केली आहे. पूर्णाने वयाच्या 18 व्या वर्षी अंटार्कटिका महाद्वीपाचे सर्वात उंच पर्वत विन्सन मासिफ (4,987 मीटर) सर केले आहे. अशी कामगिरी करणारी ती सर्वात कमी वयाची गिर्यारोहक आहे. तेलंगाणा सोशल वेलफेअर रेजिडेंशियल एज्युकेशन इंस्टिट्यूशन सोसायटी यांनी याबाबत माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, अंटार्कटिका महाद्वीपावरील सर्वात उंच शिखर विन्सन मासिफ सर करणे पूर्णासाठी मोठे यश आहे. पूर्णा जगातील पहिली आणि सर्वात कमी वयातील महिला गिर्यारोहक आहे, जिने सहा महाद्वीपांवरील सहा सर्वात उंच शिखर सर केले आहेत.

पूर्णा आपल्या कामगिरीसाठी तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि कल्याणमंत्री कोप्पुला ईश्वर यांचे देखील आभार मानले. ती म्हणाली की, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पाठिंबा नसता मिळाला तर ही कामगिरी करूच शकले नसते.

पूर्णाने आतापर्यंत अनेक मोठमोठे शिखर सर केले आहेत. यामध्ये एवरेस्ट (आशिया, वर्ष 2014), माउंट किलिमंजारो (आफ्रिका, 2016), माउंट एल्ब्रस (यूरोप, 2017), माउंट अकोंकागुआ (दक्षिण अमेरिका, 2019) माउंट कारस्टेंसज (ओशिनिया क्षेत्र, 2019) आणि माउंट विन्सन मासिफ (अंटार्कटिका, 2019) यांचा समावेश आहे.

Leave a Comment