3डी प्रिटेंड कॉपी बनविणाऱ्या पिता-पुत्रासाठी लॅम्बोर्गिनीने पाठवली खरी कार

Image Credited – Lamborghini Vancouver

अमेरिकेच्या कोलोराडो येथे राहणाऱ्या एका 54 वर्षीय व्यक्तीने आपल्या 12 वर्षीय मुलासोबत मिळून 3.3 कोटींच्या लॅम्बोर्गिनी कारची कॉपी 3डी प्रिटिंगद्वारे तयार केली आहे. लॅम्बोर्गिनी अवेंटाडोरची कॉपी बनविण्यासाठी त्यांना 2 वर्ष लागली.

रेसिंग गेम खेळत असताना 54 वर्षीय फिजिसिस्ट स्टर्लिंग बक्स आणि त्यांचा 12 वर्षीय मुलगा जेंडरला ही कल्पना सुचली होती. दोघेही ख्रिसमसला दोन आठवड्यांसाठी लॅम्बोर्गिनी अवेंटाडोर मॉडेल भाड्याने घेऊन सुट्ट्यांचा आनंद घेऊ इच्छित होते. कंपनीला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्टर्लिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर कंपनीने या पिता-पुत्रासाठी दोन आठवड्यांकरिता लग्झरी कार अवेंटाडोर एस पाठवली.

स्टर्लिंग यांनी सांगितले की, दोन महिन्यांपुर्वी त्यांना कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर काटिया बस्सी यांचा फोन आला होता. त्यांना कंपनीला आमच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा असल्याचे सांगितले व ख्रिसमसच्या दोन आठवड्यांपुर्वी लॅम्बोर्गिनी पाठवणार असल्याचे देखील सांगितले.

रिपोर्टनुसार, स्टर्लिंग यांच्या कुटूंबाने 26 डिसेंबरला कंपनीला कार परत केली. स्टर्लिंग यांनी सांगितले की, त्यांनी रोज कारचा प्रवास केला, हे ते कधीच विसरू शकत नाहीत. आपल्या मुलाला देखील कारबद्दल, इंजिनबद्दल खूप माहिती दिली.

Leave a Comment