या मार्गावर धावणार 2100 ई-वाहने, मार्गावरून वेगळे झाल्यास होणार लॉक

Image Credited – New Indian Express

देशातील पहिल्या दोन एंटी थेफ्ट ई-हायवेवर यावर्षी इलेक्ट्रिक वाहनांची वाहतूक सुरू होईल. दिल्ली ते आग्रा (यमूना-एक्सप्रेस वे ) आणि दिल्ली ते जयपूर 500 किमीमधील ईलेक्ट्रिक हायवेचे काम पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

यासाठी खाजगी ऑपरेटरने एका वर्षात 100 बस आणि 2000 कार टॅक्सी चालवण्याची परवानगी दिली आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या वाहनांमधील कोणतेही वाहन आपल्या निश्चित मार्गावरून इकडे-तिकडे झाले तर त्वरित लॉक होईल. यासाठी ग्रेटर नोएडा आणि गुडगावमध्ये दोन कंट्रोल रूम तयार केले जातील. हे दोन हायवे सुरू झाल्यानंतर देशभरात आणखी 9 हायवेंना ई-हायवे बनविण्यात येईल.

ई-हायवेच्या ताफ्यात समावेश सर्व वाहने टेलीमॅट्रिक्सद्वारे चार्जिंग स्टेशनशी कनेक्ट असतील. वाहनांच्या मार्गाचे मॅपिंग केले जाईल. जर एखादे वाहन निश्चित मार्गावरून वेगळे होईल, तेव्हा ऑटोमॅटिक अलार्म वाजेल. त्यानंतर कंट्रोल रूमवरून ड्रायव्हरशी संपर्क साधला जाईल. तेथून कोणतेच उत्तर न आल्यास वाहन लॉक केले जाईल. यामुळे सर्व चार्जिंग पॉइंट बंद होतील व वाहन जागीच उभे राहिल. ही सुविधा केवळ नोंदणीकृत वाहनांसाठीच असेल.

नॅशनल हायवे इलेक्ट्रिकल व्हिकल प्रोजेक्टचे संचालक अभिजीत सिन्हा यांनी सांगितले की, या हायवेवर 30 मिनिटाच्या आत वाहनांना बॅकअप देण्याची सुविधा आहे. वाहन आणि चार्जिंग स्टेशन एकमेंकान लिंक असल्याने ज्या-ज्या स्टेशनवरून गाडी जाईल, त्याच्या पुढील स्टेशनला याची माहिती देण्यात येईल. 100-100 किमीवर चार्जिंग पॉइंट असतील. याशिवाय स्वतः गाडी चालवून आग्रा अथवा जयपूरला जाऊ इच्छित असेल तर त्याला गाडी भाड्याने घेण्याची देखील सुविधा आहे.

या दोन हायवेनंतर मुंबई-पुणे, अहमदाबाद-वडोदरा, बंगळुरु-मैसूर हायवे, बंगळुरू-चेन्नई हायवे, सुरत- मुंबई, आग्रा-लखनऊ, ईस्टर्न फेरीफेरल वे, दिल्ली-आग्रा एनएच-2 हायवे आणि हैदराबाद-ओआरआर हायवेंना देखील ई-हायवेंमध्ये बदलले जाईल.

 

Leave a Comment