…म्हणून 10 वर्षांच्या मुलाला विमानतळावर बदलण्यास सांगितले टी-शर्ट

Image Credited – news18

विमानतळा बैकायदेशीररित्या सामान घेऊन जाणाऱ्यांचा कपड्यांची तपासणी केल्याचे तर तुम्ही ऐकले असेलच. मात्र कधी टी-शर्टवरील चित्रामुळे एखाद्या व्यक्तीला थांबवले गेल्याचे ऐकले आहे का ?

दक्षिण आफ्रिकेच्या ओआर टांबो विमानतळावर आपल्या कुटुंबाबरोबर जात असलेल्या 10 वर्षीय मुलाला टी-शर्ट बदलण्यास सांगण्यात आले, कारण त्या मुलाच्या टी-शर्टवर सापाचे चित्र होते. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी याबद्दल कारण सांगितले की, सापाचे चित्रामुळे विमानातील प्रवाशी आणि क्रू मेबर्सला अस्वस्थ वाटू शकते.

10 वर्षीय लुकसची आई मार्गा आणि वडील स्टिव्ह यांनी सांगितले की, ते 17 डिसेंबरला प्रवासाला निघाले होते. यावेळी लुकसने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता व त्यावर हिरव्या रंगाचा साप होता. हे टी-शर्ट पाहिल्यावर विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले आणि टी-शर्ट काढण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, ते हवे तर टी-शर्टच्या वरती काहीही घालू शकतात.

लुकसच्या आईने सांगितले की, आम्हाला कोणताही वाद नको होता. त्यामुळे आम्ही लुकसला शर्ट उलटे करून घालण्यास सांगितले.

https://twitter.com/aviation07fails/status/1210206209065787392

या घटनेनंतर लुकसच्या कुटुंबातील सदस्यांनी ई-मेलद्वारे विमानतळ कंपनीला बोर्डिंग करताना कोणते कपडे परिधान करायचे याच्याबद्दल देखील माहिती मागितली. त्यांनी मेलमध्ये लिहिले की, तुमचे धन्यावाद, तुमच्यामुळे कपड्यांबद्दल नियम समजला. मात्र कृपया विमानतळावर आणखी कोणत्या प्रकारचे कपडे घालू नये हे सांगण्याचे कष्ट घ्याल का ?

या मेलला उत्तर देताना विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा अधिकाऱ्यांना अधिकार आहे की कोणत्याही अस्वस्थ स्थिती निर्माण करणाऱ्या गोष्टींना विमानतळ आणि विमानात जाण्यापासून रोखू शकतात.

Leave a Comment