
सेंट्रल रेल्वेसाठी अनेक जागांची भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वेने अप्रेंटिस पदासाठी (शिकाऊ उमेदवार) अर्ज मागवले असून, पात्र उमेदवार 22 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.
सेंट्रल रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी 2,562 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. 22 जानेवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
शैक्षणिक योग्यता –
उमेदवारांची शिक्षण हे 10 वी पास असणे गरजेचे आहे अथवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून समान परिक्षेत कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक आहेत. आयआयटी पास झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयाची अट –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया –
या पदांसाठी उमेदवारांची निवड मेरिटद्वारे केली जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी रेल्वेची अधिकृत वेबसाईट www.rrccr.com ला देखील भेट द्या.