एअरटेल देत आहे आयफोन 11 प्रो मॅक्स जिंकण्याची संधी

Image Credited – Gadgets Now

नवीन वर्षानिमित्ताने एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. एअरटेलने स्पेशल प्रमोशनल एक्टिव्हिटी ‘Airtel Happy Holidays’ ऑफर लाँच केली आहे. ज्याच्या अंतर्गत युजर्सला लाखोंचे बक्षीस जिंकण्याची संधी आहे. बक्षीसांच्या यादीत आयफोन 11 प्रो मॅक्स आणि स्मार्ट टिव्हीचा देखील समावेश आहे. यासाठी युजर्सला आपल्या फोनमध्ये Airtel Thanks अॅप डाउनलोड करावे लागेल.

असे मिळेल बक्षीस –

अॅप डाउनलोड केल्यानंतर सर्वात प्रथम ‘Airtel Happy Holidays’ सेक्शनवर टॅप करावे. एअरटेलच्या या ऑफरमध्ये नातेवाईकांना शुभेच्छा पाठवाव्या लागतील. त्यानंतर विश करणाऱ्याला वेगवेगळे स्टिकर्स जिंकण्याची संधी मिळेल.

या प्रकारे युजर्सला सर्व पाच Winter Special Stickers’ जमा करावे लागतील. असे केल्यावर त्यांना बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल. या पाच स्टिकर्समध्ये युजर्सला नॉर्थ स्टार, फँटेसी कप केक, सँटा सॉक्स, हॉट चाकलेट आणि स्नोई फ्लेक्स स्टिकर्स मिळतील.

कोणालाही स्टिकर्स पाठवण्याचा अर्थ असा की, पाठवणाऱ्या आणि रिसिव्ह करणाऱ्या दोघांकडे हे स्टिकर्स असतील.

5 स्टिकर्स कलेक्ट केल्यानंतर युजर्सला स्क्रॅच कार्ड मिळेल. सर्व विजेत्यांना बक्षीस जिंकल्यानंतर 72 तासांनी नॉटिफिकेशन येईल. जिंकलेले बक्षीस मिळवण्यासाठी विजेत्याला आपला पत्ता द्यावा लागेल. अगर युजर्स वाउचर्स जिंकतात तर त्यांना 72 तासांच्या आत एसएमएसद्वारे कंफर्मेशन मिळेल. एअरटेलची ही खास ऑफर केवळ अँड्राईड युजर्ससाठी असून, याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2020 आहे. हे एकप्रकारे गुगल पे स्टॅम्पशी मिळते जुळते आहे.

Leave a Comment