यावर्षी टर्बो इंजिनसह लाँच होणार 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कार्स

Image Credited – CarWale

2020 हे वर्ष ऑटो सेक्टरसाठी खास आहे. 2020 मध्ये अनेक इलेक्ट्रिक गाड्या लाँच होणार आहे. 2020 मध्ये 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत लाँच होणाऱ्या गाड्यांविषयी जाणून घेऊया.

Image Credited -Amarujala

ह्युंडाई ग्रँड आय10 निओस –

ह्युंडाईने नवीन वर्षात ह्युंडाई ग्रँड आय10 निओसचे स्पोर्टी व्हर्जन आणणार आहे. यामध्ये ह्युंडाई वेन्यूचे 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल. जे 100 एचपी पॉवर देईल. सोबतच ड्युअल क्लचसह 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन देखील मिळेल. यामध्ये ब्लँक इंटेरिअर मिळण्याची शक्यता आहे. या कारची किंमत 8 लाखांपर्यंत असू शकते.

Image Credited -Amarujala

ह्युंडाई ऑरा –

ह्युंडाईची ऑरा ही कार 21 जानेवारी 2020 ला लाँच होणार आहे. यामध्ये बीएस6 इंजिन मिळेल. कंपनी 2020 मध्ये 1.0 लिटरचे 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनसह ही कार लाँच करेल. जे 100 पीएस पॉवर आणि 172 एनएम टॉर्क देते.

या कारमध्ये बीएस6 मानंकन 1.2 लिटर Kappa T-GDI चार सिलेंडर इंजिन देईल, जे 74 एचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय कंपनी 3 सिलेंडर 1.2 लिटरचे ECOTORQ  डिझेल इंजिन देखील देईल.

Image Credited -Amarujala

ह्युंडाई आय20 –

ह्युंडाई आपल्या या तिसऱ्या कारला टर्बो इंजिनसोबत लाँच करेल. या नेक्सट जनरेशन कारमध्ये कंपनी 1.0 लिटर 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देईल, जे 120 एचपी पॉवर देते. यात क्लच ट्रांसमिशन देखील मिळेल.

Image Credited -Amarujala

फॉक्सवेगन पोलो –

फॉक्सवेगन आपली लोकप्रिय कार पोलोचे GT TSI 1.23 लिटर टर्बो इंजिन बंद करू शकते व त्या जागी बीएस6 1.0 लिटर 3 सिलेंडर असणारे इंजिन देऊ शकते. हे इंजिन 115 एचपी पॉवर आणि 200 एनएम टॉर्क देते. सोबतच आधीप्रमाणे यात ड्युअल क्लच ट्रांसमिशन मिळेल.

Image Credited – India Today

टाटा अल्ट्रोज जेटीपी –

टाटा अल्ट्रोझ 22 जानेवारीला लाँच होणार आहे. या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन मिळेल. अल्ट्रोज बीएस6 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह लाँच होईल, जे 115 एचपी पॉवर देईल.

Image Credited -Amarujala

किआ कॉम्पॅक्ट एसयूव्ही –

किआ मोटर्स नवी वर्षात ऑटो एक्सपो 2020 मध्ये नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करू शकते. यामध्ये बीएस6 मानक 1.2 लीटर पेट्रोल, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळेल. टर्बो पेट्रोलमध्ये 7 स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशन आणि डिझेलमझ्ये 6 स्पीड ऑटोमेटिव्ह ट्रांसमिशन मिळेल. Kia QYI ची किंमत 7 ते 11 लाखादरम्यान असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment