रोनाल्डो सहाव्यांदा ग्लोबल सॉसर अॅवॉर्डचा मानकरी


पोर्तुगालचा स्ट्रायकर फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने सहाव्यांदा सर्वश्रेष्ठ पुरुष फुटबॉलर साठी दिले जाणारे ग्लोबल सॉसर अॅवॉर्ड जिंकले असून हा सोहळा दुबई मध्ये नुकताच पार पडला. युवेंटस क्लबकडून खेळणारया रोनाल्डोने त्याच्या ९ वर्षाच्या कारकीर्दीत ६ व्यांदा हे अॅवॉर्ड जिंकले आहे आणि सलग चौथ्या वेळी त्याने हे अॅवॉर्ड मिळविले आहे.

इंग्लंडच्या लुसी ब्राँझ हिला सर्वश्रेष्ठ महिला फुटबॉलर म्हणून निवडले गेले असून लीवरपूलचे जर्गुन क्लोप यांची सर्वश्रेष्ठ मॅनेजर म्हणून निवड झाली. रोनाल्डो यंदा बेलेन डीओर मध्ये लियोनेल मेस्सी आणि वर्जिल वान डीक यांच्यानंतर ३ ऱ्या क्रमांकावर आहे. ३४ वर्षीय रोनाल्डोने २०१८-१९ मध्ये युवेंटस ला सिरी चँपियन बनविले होते. पुरस्कार स्वीकारल्यावर तो म्हणाला, माझा परिवार, गर्लफ्रेंड, मुले आणि माझे चाहते, एजंट आणि दुबई या सर्वाना धन्यवाद. तुम्ही सर्वानी मला नेहमीच सपोर्ट दिला आहे.

यंदाचे बेस्ट गोलकीपरचे अॅवॉर्ड एलिसन बेकर (लिव्हरपूल, ब्राझील) याला दिले गेले.

Leave a Comment