नव्या वर्षात बॉलीवूडची गगनभरारी


नव्या वर्षात बॉलीवूडमध्ये बायोपिकची भरमार असून ११ बायोपिक या वर्षात रिलीज होणार आहेत. जान्हवी कपूर भारतीय हवाई दलाची पहिली महिला पायलट गुंजन सक्सेना हिची भूमिका साकारणार असून गुंजनने कारगील युद्धात जखमी सैनिकांना वाचविण्याची महत्वाची कामगिरी पार पाडली होती. कारगील गर्ल असे या सिनेमाचे नाव आहे.

यंदा ११ बायोपिक बरोबर १२ सिक्वेलही झळकणार आहेत. त्यात १९९६ मध्ये आलेल्या कमल हसनच्या इंडियनचा इंडियन दोन हा चित्रपट महत्वाचा आहे कारण तो सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटासाठी ३०० कोटी खर्च केले जाणार आहेत. अन्य बायोपिक मध्ये दीपिकाचा छपाक, कंगनाचा जयललिता यांच्यावरचा थलाइवी, तापसी पन्नूचे रश्मी रॉकेट आणि मिताली राज यांच्यावरचे दोन चित्रपट, शकुंतलादेवी यांच्यावरचा विद्या बालनचा चित्रपट तसेच साईना नेहवालवरचा परिणीती चोप्राचा चित्रपट यांचा समावेश आहे. तसेच तानाजी, पृथ्वीराज चौहान, कपिलदेव वरचा ८३, विक्की कौशलचा उधमसिंग यांचा समावेश आहे.

ट्रेड मॅगेझीन कंप्लीट सिनेमा बॉक्स नुसार बॉलीवूडने यंदा प्रथमच ४३५० कोटींचा व्यवसाय केला असून २०२० मध्ये त्यात १५ ते २० टक्के वाढ होऊन तो ५ हजार कोटींचा टप्पा ओलांडेल.

Leave a Comment