थिसारा परेरा बॅट त्यागून श्रीलंकन लष्करात दाखल


श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थीसारा परेरा श्रीलंकन लष्करात दाखल झाला असून त्याला मेजर पदी नियुक्त केले गेले आहे. तो श्रीलंकेच्या गाजाबा रेजिमेंट मध्ये रुजू झाला आहे. टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी यानेही काही काळ भारतीय सेनेत जबाबदारी पार पाडली असून त्याला मानद मेजरपद दिले गेले आहे.

३० वर्षीय परेरा याने त्याच्या ट्विटर अकौंटवरून श्रीलंकन सेनेत दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला आर्मी कमानदार लेफ्ट. जनरल शिवेंद्र सिल्वा यांनी त्याला श्रीलंकन सेनेत दाखल होण्याचे आमंत्रण दिले आणि त्याने ते स्वीकारले. थिसारा श्रीलंकेचा स्टार ऑलराउंडर खेळाडू असून त्याने टीम साठी कप्तानी केली आहे. आयपीएल मध्ये तो वेगवेगळया सहा संघांकडून खेळला आहे. त्यात मुंबई इंडीयन्स, कोच्ची टस्कर्स केरळ, चेन्नई सुपरकिंग्स, रायझिंग पुणे, सुपर जायंट्स, सनरायझर्स हैद्राबाद या टीम्सचा समावेश आहे.

श्रीलंकेचा माजी कप्तान दिनेश चान्दिमल यानेही श्रीलंका आर्मी वॉलीटर्स फोर्स यंदा जॉईन केला असून त्याने आर्मी क्रिकेट टीम कडून खेळण्याचा आलेला प्रस्ताव स्वीकारला आहे.

Leave a Comment