शाओमीच्या एमआय 10, एमआय 10 प्रोचे स्पेसिफिकेशन लीक

Image Credited – Aajtak

शाओमी नवीन वर्षात आपले दोन नवीन स्मार्टफोन एमआय 10 आणि एमआय 10 प्रो लाँच करणार आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम प्लॅगशिप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 865 देण्यात येणार आहे. हे फोन कधी लाँच होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नसली तरी फोन संबंधीत स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत.

या दोन्ही फोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. हे स्मार्टफोन्स 3 व्हेरिएंटमध्ये लाँच केले जातील, ज्यात 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+512GB हे व्हेरिएंट असतील.

एमआय 10 मध्ये 6.5 इंच ओलेड डिस्प्ले मिळेल. या फोनमध्ये 4 रिअर कॅमेरे देण्यात येतील. ज्यातील प्रायमेरी कॅमेरा SONY IMX686 असेल. दुसरा कॅमेरा 20 मेगापिक्सल आणि तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सल असेल, तर चौथा कॅमेरा 5 मेगापिक्सल असण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, यात 30X डिजिटल झूम सपोर्ट देखील मिळेल. या फोनमध्ये 4500 एमएएच बॅटरी मिळेल, जी 40 वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

एमआय 10 प्रो स्मार्टफोनमध्ये देखील 6.5 इंचचा 90Hz OLED डिस्प्ले मिळेल. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असू शकतो, ज्यात 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल. या फोनमध्ये देखील 4 रिअर कॅमेरे देण्यात येतील. मात्र याचा प्रायमेरी कॅमेरा 108 मेगापिक्सल असेल. दुसरा कॅमेरा 48 मेगापिक्सल, तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि चौथा 8 मेगापिक्सल डेप्थ सेसिंग कॅमेरा असेल.

एमआय 10 ची किंमत 3,199 युआन (जवळपास 32,700 रुपये) पासून सुरू होऊ शकते. तर एमआय 10 प्रो ची किंमत 3,700 युआन (जवळपास 38,900 रुपये) पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment