आता थेट ड्रेसवरच पिकवा फळे आणि पाले-भाज्या

Image Credited – CBC

अरूसिआक गेब्रियाल नावाच्या एका डिझाईनरने असा ड्रेस तयार केला आहे, जो तुम्ही परिधान तर करूच शकता. मात्र त्याचबरोबर त्या ड्रेसवर तुम्ही फळे, पाले-भाज्या देखील पिकवू शकता. हा ड्रेस एक प्रकारचे शेत अथवा बगीचाच आहे.

गेब्रियलचा हा प्रोजेक्ट फ्रान्सच्या बॉटनिस्ट पॅट्रिक ब्लँकच्या वर्टिकल गार्डन्सवरून प्रेरणा घेतलेला आहे. याला मातीची गरज लागत नाही. गेब्रियलने हा ड्रेस तयार करण्यासाठी ओलावा रोखणाऱ्या एका कापडाचा थराला बनियनचा आकार दिला आहे. यामध्ये मायक्रोग्रीन भाज्यांची बियाणे ठेवता येतील. पेरलेली बियाणे वाढण्यासाठी दोन आठवडे लागतात. झाडांची गरज पुर्ण करण्यासाठी परिधान करणाऱ्या व्यक्तीच्या लघवीपासून भागवली जाते. मात्र लघवी झाडांपर्यंत पोहचण्याआधी फॉरवर्ड ऑस्मोसिस प्रक्रियेतून जाते.

Image Credited – CBC

गेब्रियल युनिवर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्नियामध्ये आर्किटेक्टकच्या असिस्टेंट प्रोफेसर आहेत. आतापर्यंत 22 प्रकारच्या भाज्या या ड्रेसवर उगवल्या आहेत. यामध्ये कोबी, गाजर, स्ट्रॉबेरी यांचा समावेश आहे. या सर्व भाज्या सोबत देखील उगवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे ड्रेस रंगीबेरंगी दिसेल.

Image Credited – CBC

एका आर्किटेक्टने प्रश्न केला होता की, भविष्यात मातीला पाणी न मिळाल्यास पिकांची काळजी कशी घेतली जाईल ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना गेब्रियलने हा ड्रेस तयार केला. मानवी शरीरातील अपशिष्ट पदार्थांद्वारे झाडांसाठी खत आणि पाण्याची गरज भागवली जाईल.

Image Credited – CBC

हा ड्रेस स्वतः गेब्रियलने परिधान करून बघितला आहे. ड्रेसवरील पाले-भाज्या वाढल्यास त्याचे वजन देखील वाढते, जेणेकरून ड्रेस परिधान करून फिरणे अवघड होते. ड्रेस परिधान केल्यावर यातील ओलाव्याची देखील जाणीव होते.

Leave a Comment