
नवीन सांस्कृतिक पर्यटनावर काम करणाऱ्या चीनने पिंगटाँग आणि लुओडियान नावाचे दोन काउंटी (तालुका) जोडणारा जगातील सर्वात उंच पिंगटाँग ग्रांड काँक्रिट टॉवर ब्रिज तयार केला आहे. दक्षिण-पश्चिम चीनच्या गियाझोऊ प्रांतंधील या दोन्ही पर्वतीय भागात सहज पोहचता येईल.
2013 मीटर लांब या ब्रिजवर वाहतूक सुरू झाली आहे. या ब्रिजशी जोडलेल्या 93 किमी लांब पिंगटाँग लुओडिआन एक्सप्रेस वेचे देखील उद्घाटन करण्यात आले. एक्सप्रेस वे आणि ब्रिज तयार झाल्याने दोन्ही क्षेत्रातीमधील प्रवास करण्याचे अंतर अडीच तासावरून 1 तास झाले आहे.
काओडू नदीवर 332 मीटर वरती बांधण्यात आलेला हा ब्रिज तीन टॉवरवर उभा आहे. याची उंची जवळपास 110 मजली इमारती एवढी आहे. चीनच्या पर्वतीय भागातील क्षेत्रामधील गरिबी दूर करण्यासाठी तेते पर्यटन सुविधा वाढवण्यात येत आहे. हा ब्रिज याचाच एक भाग आहे. 2016 पासून या ब्रिजचे काम सुरू होते. या ब्रिजवर गाड्या ताशी 80 किमीच्या वेगाने धावू शकतील.
हा ब्रिज तयार करण्यासाठी 1500 कोटी रुपये खर्च आला असून, हा ब्रिज 2135 मीटर लांब आहे.