हर्षा भोगले यांच्याबरोबर झालेल्या वादावर मांजरेकरांची दिलगिरी

Image Credited – Scroll

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी 2019 हे वर्ष आपल्यासाठी विश्लेषक आणि समालोचक म्हणून खूपच वाईट गेल्याचे म्हटले आहे. भारताच्या पहिल्या वहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यादरम्यान क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्याबरोबर झालेल्या वादावर त्यांनी सफाई दिली आहे.

या वादावर मांजरेकर म्हणाले की, माझे ते वागणे कामाला न शोभणारे आणि अनुचित होते. आपल्या वागणुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोलकात्यात पार पडलेल्या भारत आणि बांग्लादेशमधील पिंक बॉल कसोटी सामन्यात बॉलच्या व्हिजिबिलिटीवरून हर्षा भोगले व संजय मांजरेकर यांच्यात वाद झाला होता.

आपल्या या वर्तणुकीविषयी मांजरेकर म्हणाले की, त्यावेळी मी स्वतःवरील नियंत्रण गमावले होते व मी अनप्रोफेशनल झालो होतो. मी चुकीचा होतो व त्याबद्दल मला पश्चाताप आहे. मला या गोष्टीचा त्रास होतो की, मी माझ्या भावनांना माझ्यावर हावी होऊ दिले. हे अनप्रोफेशनल असण्याबरोबरच अनुचित देखील आहे.

मांजरेकर म्हणाले की, चुक समजल्यानंतर मी त्वरित जाऊन प्रोड्युसरकडे माफी मागितली.

Leave a Comment