सॅमसंगचा हा खास स्मार्टफोन वाढवणार गरजेनुसार डिस्प्लेचा आकार

Image Credited- The Mobile Indian

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने एक पेटेंट फाइल केले आहे. यावरून समजते की, कंपनी लवकरच एक एक्सपेंडेबल डिस्प्ले असणारा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. पेटेंटनुसार, या हटके स्मार्टफोनमध्ये डिस्पेलेला गरजेनुसार छोटे अथवा मोठे करता येईल. यासाठी फोनमध्ये मुव्हेबल बॅकसाइड प्लेट दिली जाईल.

हा सॅमसंगचा दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन असेल. यामध्ये पंच होल सेल्फी कॅमेऱ्यासोबत फोल्डेबल इन्फिनिटी-ओ डिस्प्ले मिळू शकतो. एक सेकेंडरी डिस्प्ले बाहेरील बाजूस असेल. यामध्ये ड्युअल लेंस प्रायमेरी कॅमेरा मिळेल.

याशिवाय कंपनी लवकरच गॅलेक्सी एस11+ स्मार्टफोन लाँच करणार आहे. यात 5 रिअर कॅमेरे मिळण्याची शक्यता आहे व मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सल असू शकतो.

Leave a Comment