ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देणार रिलायन्सचे ‘जिओ मार्ट’

Image Credited – livemint

भारतात ऑनलाईने खरेदीचे प्रमाण मागील काही काळात वाढले आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साईट्सवरून भारतीय जोरदार खरेदी करतात. मात्र वर्ष 2020 मध्ये या दिग्गज कंपन्यांना आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कारण मुकेश अंबानी यांच्या मालकीचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेटच्या रिलायन्स रिटेल लिमिटेडने ‘जिओ मार्ट’ची सुरूवात केली आहे. जिओ मार्टच्या रजिस्ट्रेशनसाठी कंपनीने जिओ टेलिकॉम युजर्सला आमंत्रण देण्यास देखील सुरूवात केली आहे. जिओ मार्टला कंपनीने देशाचे नवीन दुकान म्हटले आहे. याची सुरूवात नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण येथून होईल.

या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही जिओ मार्ट लाँच केले आहे. यासाठी जिओ युजर्सला डिस्काउंटसाठी रजिस्टर करण्याचे आमंत्रण दिले जाईल. लवकरच याचा विस्तार केला जाईल व याचे मोबाईल अ‍ॅप देखील लाँच केले जाईल.

याआधी मुकेश अंबानी यांनी देखील याबाबत माहिती दिली होती. रिलायन्सची योजना देशात जगातील सर्वात मोठे ऑनलाईन–टू-ऑफलाईन ई कॉमर्स बाजार तयार करणे हे आहे. रिलायन्सने याला ‘न्यू कॉमर्स’ असे नाव दिले आहे.

रिलायन्सच्या नवीन प्लॅन अंतर्गत किराना स्टोर्सला जोडले जाईल. ज्याचा वापर ग्राहकांना ऑर्डर सप्लाय करण्यासाठी केला जाईल.

Leave a Comment