नवीन वर्षात लाँच होणार रिअलमीचा हा शानदार स्मार्टफोन

Image Credited – NDTV

नवीन वर्षासोबतच रिअलमीने नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगची तयारी केली आहे. कंपनी लवकरच नवीन स्मार्टफोन रिअलमी 5आय बाजारात आणणार आहे. रिपोर्टनुसार, हा नवीन स्मार्टफोन 6 जानेवारीला लाँच होऊ शकतो.

डिझाईनच्या बाबतीत रिअलमी 5आय हा रिअलमी 5 आणि 5एस सारखाच असण्याची शक्यता आहे. याचा बॅक पॅनेल थोडा वेगळा असेल. या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिजॉल्युशन एचडी+ असेल. या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटर्नल स्टोरेज असेल व स्नॅपड्रॅगन 665 SoC प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.

Image Credited – India Today

हा फोन अँड्राईड 9 पायवर आधारित ColorOS 6.1 वर काम करेल. या फोन हिरव्या आणि निळ्या रंगात मिळेल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर या फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये 12 मेगापिक्सलचा प्रायमेरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा असेल. तसेच 2 कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे असतील. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सल कॅमेरा मिळण्याची शक्यता.

रिअलमी 5आय ची किंमत 13,200 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 5000 एमएएचची बॅटरी मिळेल.

Leave a Comment