
झुरळ भलेही तुम्हाला आवडत नसेल अथवा तुम्ही त्याला घाबरत असाल. मात्र चीनमधील लोकांसाठी हे एक कमाईचा मार्ग आहे. झुरळांमधील संभावित औषधी गुणांमुळे चीनी उद्योगासाठी व्यावसायिक संधी आहे. चीनसह अनेक आशियाई देशांमध्ये झुरळ तळून खाल्ले जातात.

चीनच्या शीचांग शहरात एक औषधांची कंपनी दरवर्षी 600 कोटी झुरळे पाळते. एका इमारतीमध्ये याचे पालन केले जाते. या बिल्डिंगचे क्षेत्रफळ जवळपास दोन खेळांच्या मैदानाएवढे आहे. त्यांच्यासाठी जेवण-पाण्याची देखील सोय केली जाते. त्यांनी सुर्याच्या किरणापासून लांब ठेवले जाते व बिल्डिंगच्या बाहेर जाऊ दिले जात नाही.

आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे या झुरळांवर लक्ष दिले जाते. याद्वारे इमारतीच्या आतील तापमान, जेवणाची उपलब्धता आणि ओलाव्यावर नियंत्रण ठेवले जाते. लक्ष्य कमी वेळेत अधिकाधिक झुरळांना जन्म घालणे हे आहे. जेव्हा झुरळांचे वय होते, त्यावेळी त्यांना मारले जाते व त्याला सरबताप्रमाणे चीनच्या परंपरागत औषधाप्रमाणे पिले जाते. याचा वापर अतिसार, उल्टी, श्वासाचे आजार आणि अन्य आजारांच्या उपचारासाठी केला जातो.

औषधांसाठी झुरळांचे पालन सरकारी योजनेचा भाग आहे. याच्या औषधांचा हॉस्पिटलमध्ये वापर केला जातो. मात्र अनेकजण यावर चिंता देखील व्यक्त करतात.
एका बंद जागी या प्रकारे किडे पाळणे आणि त्यांचे निर्माण करणे धोकादायक ठरू शकते. मनुष्याची चुकी अथवा भुकूंपामुळे हे कोट्यावधी झुरळे बाहेर आले तर यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.