चोरीला गेलेला फोन शोधण्यासाठी सरकारने लाँच केले पोर्टल

Image Credited – Jagran

वाढते गुन्हे आणि ऑनलाईन फसवणुकीमुळे मोबाईल हरवणे ही मोठी समस्या झाली आहे. मात्र आता हरवलेले फोन शोधण्यासाठी सरकारने एक खास वेब पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे वेब पोर्टल लाँच केले. सध्या या पोर्टलाचा वापर केवळ दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्येच करता येईल.

ही सिस्टम तयार करण्यासाठी दिल्ली पोलीस आणि डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने मिळून काम केले आहे. सप्टेंबरपासून याची टेस्टिंग सुरू होती.

हरवलेल्या फोनची अशी मिळवा माहिती –

सर्वात प्रथम फोन चोरी अथवा हरवला असल्याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा. नंबर ब्लॉक झाल्यास एफआयआरची कॉपी आणि आयडी प्रुफसह नवीन सिमकार्डसाठी अर्ज करा. आता फोनचा आयएमईआय नंबर ब्लॉक करण्यासाठी ceir.gov.in या साईटवर जा.

या पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट आयडी मिळेल. या रिक्वेस्ट आयडीचा वापर तुम्ही तुमचा मोबाईल फोन ट्रॅक करण्यासाठी करू शकता. मोबाईल फोन सापडल्यावर तुम्ही ब्लॉक केलेला आयएमईआय नंबर पुन्हा अनब्लॉक करून फोनचा वापर करू शकता.

टेलिकॉम ऑपरेटर शेअर करतात डेटा –

चोरी अथवा हरवलेला मोबाईल फोन शोधण्यासाठी सेंट्रल आयडेंटी रजिस्ट्री सिस्टम तयार करण्यात आली आहे. ही सिस्टम देशातील सर्व ऑपरेटर्सच्या आयएमईआय डेटाबेसशी कनेक्ट आहे. टेलिकॉम ऑपरेटर या नेटवर्कमध्ये आपल्या सर्व युजर्सच्या मोबाईल फोनचा डेटा शेअर करतात. जेणकरून फोन चोरी अथवा हरवल्यास त्याचा चुकीचा वापर होऊ नये.

सर्व मोबाईलमध्ये एक यूनिक आयएमईआय नंबर असतो. हा नंबर बदलता येतो. चोरी करणारे याला रिप्रोग्राम करतात. यामूळे आयएमईआयची क्लोनिंग होते व एकाच नंबरवर अनेक फोन वापरले जातात. जर हे नंबर ब्लॉक केले तर मोबाईल चोरी झाल्यास अडचण येऊ शकते. यामुळे डुप्लिकेट आणि फेक आयएमईआय फोनपासून सुटका मिळवणे गरजेचे आहे. याचसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

Leave a Comment