…तर गौतम गंभीरला सोडावे लागेल खासदारकीवर पाणी!


नवी दिल्ली : 13 जानेवारीपर्यंत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला (डीडीसीए) नवीन अध्यक्षांची निवड करायची आहे. हे पद सध्या भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने स्वीकारावे अशी मागणी जोर धरत आहे. पण अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी गंभीरला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. हे पद रजत शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त आहे.

दरम्यान दुसरीकडे फेब्रुवारीपर्यंतची वेळ अध्यक्षपदासाठी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर डीडीसीएने असे स्पष्ट केले आहे की गौतम गंभीर लोढा समितीच्या शिफारसीनुसार अध्यक्षपदासाठी सध्या पात्र नाही. पण अध्यक्षपद गंभीरला स्वीकारयचे तर त्याला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.

मिड डेला दिलेल्या मुलाखतीत डीडीसीएचे सचिव विनोद ताहिरा यांनी असे सांगितले की, गौतम गंभीरचे अध्यक्ष म्हणून स्वागत आहे. पण यासाठी त्याला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. बीसीसीआय ही आमची मुख्य संस्था आहे. गंभीर हा ज्येष्ठ खेळाडू असल्यामुळे सर्व निर्णय हे नियमांमध्ये घेतले जातील.

तर, डीडीसीएचे सरचिटणीस विनद तिहाडा म्हणाले, अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यासाठी लोकपाल दीपक वर्मा यांना अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केली जाईल. निवडणुका जानेवारीच्या अखेरीस होणार आहेत, परंतु फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुका घ्यावेत अशी विनंती केली जाईल. तर, रजत शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी गंभीर यांनी उमेदवारी दिल्याबद्दल तिहाडा म्हणाले, दिल्ली क्रिकेटची सेवा केल्याचे त्यांचे स्वागत आहे, परंतु खासदारकीचा राजीनामा दिल्यासच ते अध्यक्ष होऊ शकतात.

Leave a Comment