अरेच्चा ! या जोडप्याने टॉस करून ठरवले लग्नानंतर कोणाचे आडनाव वापरायचे

Image Credited – scoopwhoop

लग्नानंतर मुलीला आपले आडनाव बदलून मुलाचे नाव लावावे लागते. मात्र फ्लोरिडाच्या या नवविवाहित जोडप्याने असे काही केले की, ज्यामुळे तुम्ही त्यांचे कौतूक कराल. फ्लोरिडाचे जेफ कॉन्लेय आणि डॅर्सी वॉर्ड यांचा नुकताच विवाह पार पडला.

विवाहानंतर मुलीला आडनाव बदलावे लागते. मात्र या जोडप्याने एकमेंकाना 50-50 संधी देण्याचे निश्चित करत नाण्याद्वारे ठरवले की कोणाचे आडनाव लग्नानंतर वापरले जाईल. त्यांनी एक नाणे घेतले, ज्यावर एकाबाजूला डॅर्सीचे आडनाव आणि दुसऱ्या बाजूला जेफचे आडनाव लिहिलेले होते. टॉस उडवून कोणाचे नाव वापरणार हे ठरणार होते. नाणे उडवल्यावर डॅर्सीचे नाव आले आणि सर्वांनी दोघांना Mr. And Mrs. Darcy म्हणत शुभेच्छा दिल्या.

Image Credited – scoopwhoop

जेफने सांगितले की, मी फ्लोरिडाच्या शाळेत अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी कोणत्याही बाबतीत पारदर्शकता आणि इमानदारी असावी असा विचार करतो.

Image Credited – scoopwhoop

नर्स असलेली डॅर्सी म्हणाली की, एका अशा व्यक्तीबरोबर लग्नानंतरच्या आयुष्याची सुरूवात करणे, जो खूप क्रिएटिव्ह आणि मोकळ्या विचारांचा आहे. त्याच्याबरोबर पहिले पाऊल बरोबरीचे असायला हवे.

हे जोडपे टिंडर या डेटिंग अपवर एकमेंकाना भेटलो होते. तेथूनच त्यांच्या प्रेमाची सुरूवात झाली व त्याचे लग्नात रुपांतर झाले.

Leave a Comment