ही कंपनी देशभरात उभारणार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

Image Credited – autocarindia

सरकार इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. पुढील काही काळात इलेक्ट्रिक गाड्याचा बाजार देखील तेजीने वाढणार आहे. मात्र या गाड्यांसाठी सर्वात मोठी समस्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची असते. मात्र सरकार वारंवार इलेक्ट्रिक गाड्यांसाठी इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे आश्वासन देत आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनर्जी इफिशियन्सी सर्विस लिमिटेडने (ईईएसएल) देशभरात चार्जिंग स्टेशन उभारण्याविषयी मोठे पाऊल उचलले आहे.

ईईएसएलने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंगसाठी इंफ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनसोबत (एचपीसीएल) करार केला आहे.

ईईएसएल हे वीज मंत्रालयाच्या आधीन येणारे चार उपक्रम – एनटीपीसी लिमिटेड, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स, आरईसी लिमिटेडचा संयुक्त उपक्रम आहे. ईईएसएल आणि एचपीसीएलमध्ये 2 वर्षांसाठी करार झाला असून, या अंतर्गत देशभरात चार्जिंग स्टेशन उभारले जातील.

दुचाकी, तीन आणि चार चाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी योग्य ठिकाणी चार्जिंग सुविधा देण्यात येईल. यामुळे चार्जिंग स्टेशनविषयी ग्राहकांच्या मनात असलेली चिंता दूर होईल.

Leave a Comment