
बॉलिवूड स्टार रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहे. अनेकदा ते त्यांच्या लग्झरी गाड्यांमध्ये सोबत फिरताना दिसतात. त्यांच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. दीपिका आणि रणवीरकडे असलेल्या या खास गाड्यांबद्दल जाणून घेऊया.

लेम्बोर्गिनी उरुस –
रणवीर सिंहने काही दिवसांपुर्वीच लेम्बोर्गिनी उरूस एसयूव्ही खरेदी केली आहे.

एस्टिन मार्टिन –
रणवीर एकमेव स्टार आहे ज्याच्याकडे एस्टिन मार्टिन आहे. ही रणवीर आणि दीपिकाच्या गॅरेजमधील सर्वात महागडी कार आहे.

मर्सिडिज जीएलएस –
रणवीरने ही कार 2017 साली खरेदी केली होती. काळ्या रंगाची जीएलस दिसायला शानदार आहे. यामध्ये 3.0 लिटरचे व्ही6 इंजिन आहे. या एसयूव्हीची किंमत जवळपास 83 लाख रुपये आहे.

लँड रोव्हर रेंज रोव्हर –
रेंज रोव्हर Vogue बॉलिवूडमधील अनेक स्टार्सकडे आहे. रणवीरला या कारमध्ये जास्त पाहिले जात नाही. याच्या बेस मॉडेलमध्ये 3.0 लीटरचे व्ही6 डिझेल इंजिन आहे.

ऑडी क्यू5 –
ऑडीची ही शानदार कार देखील रणवीर आणि दीपिकाच्या गॅरेजचा भाग आहे. यामध्ये 2.0 लिटर डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे.

जॅग्वार –
रणवीर जवळ जॅग्वार एक्सजएल आहे. या कारणमध्ये रणवीर अनेकदा पाहण्यात आलेले आहे. यामध्ये 2.0 लीटरचे 4 सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे.

मारुती सुझुकी सिआझ –
तशी ही कार सर्वसामान्य व्यक्तींकडे देखील असते, मात्र रणवीर मारुती सिआझचा ब्रँड अँम्बेसेडर असल्याने त्याच्याजवळ देखील ही कार आहे. रणवीरला ही कार 2014 मध्ये लाँचिंगच्या वेळी मिळाली होती.

मर्सिडिज मेबॅक एस500 –
दीपिकाकडे मर्सिडिज मेबॅक एस500 कार आहे. यामध्ये 4.7 लिटर इंजिन देण्यात आले असून, या कारची किंमत 1.85 कोटी रुपये आहे.

ऑडी क्यू7 –
दीपिकाकडे ऑडी क्यू7 कार आहे. ही कार तिने 2011 मध्ये खरेदी केली होती. ही दीपिकाची पहिली कार आहे. यामध्ये 3.0 लीटरचे व्ही6 टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे.