शिवसेना खासदाराविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल


उस्मानाबाद – उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अकलूज पोलीस ठाण्यात माळेवाडी येथे घडलेल्या कथित मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सतीश दंडणाईक यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. ओमराजे निंबाळकर सध्या हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हिम्मतराव पाटील यांनी अकलूज येथे रविवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल केला होता. पण या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. माळेवाडी बोरगाव येथे कळंब पंचायत समिती सदस्य सतीश दंडनाईक हे गेले असता हिम्मतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सतीश दंडनाईक व गणेश भातलवंडे तसेच गाडीचालक चव्हाण यांना पकडून त्यांच्या घरी नेले व तेथे मारहाण केली. ओमराजे निंबाळकर यांचा यावेळी हिम्मतराव पाटील यांना फोन आला.

हिम्मतराव पाटील यांनी त्यावेळी निंबाळकर यांना सागितले की, सतीश दंडनाईक यांना आम्ही पकडले आहे. त्यावेळी ओमराजे फोनवर ओरडून सांगत होते की, दंडनाईक यांना सोडू नका, त्याला धडा शिकवा, असे स्पीकरवर फोन असताना मी ऐकले असल्याचे दंडनाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी हिम्मतराव पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर लोकांविरुद्ध सतीश दंडनाईक यांना जिवंत मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment