हुवाई पी ४० प्रोला असणार सात कॅमेरे


सोर्स एनडीटीव्ही
चीनी कंपनी हुवाईने २०२० मध्ये त्यांच्या पी सिरीज मधील स्मार्टफोन लाँचिंगच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून मार्च २०२० मध्ये पी ४० आणि पी ४० प्रो बाजारात दाखल होईल असे संकेत दिले आहेत. दरम्यान त्यांच्या पी ४० प्रो संबंधी अनेक लिक्स वेळोवेळी समोर आले आहेत. त्यात आता या फोनच्या कॅमेरा सेटअप संदर्भात मोठा खुलासा झाला असून हा फोन सात कॅमेऱ्यासह येईल असे लिक्स्टर आईस युनी तर्फे ट्विटरवर पोस्ट केले गेले आहे आणि फोनची इमेज शेअर केली गेली आहे.

त्यानुसार या फोनच्या बॅक पॅनलवर ५ तर फ्रंटला दोन कॅमेरा सेन्सर असतील. गिझमोचायनाच्या रिपोर्ट नुसार पी ४० प्रो मध्ये मेन वाईड अँगल लेन्स, १ सिने लेन्स, टीओएफ सेन्सर, १० एक्स ऑप्टीकल झूमसह १ पेरीस्कोप लेन्स, व १ टेलीफोटो लेन्स असेल. फोनसाठी ६.५ ते ६.७ इंची डिस्प्ले दिला जाईल.

कंपनीच्या कंझ्युमर बिझिनेस हेडकडून दिल्या गेलेल्या संकेतानुसार या फोनसाठी हार्मनी वर आधारित ओएस दिली जाईल आणि पॉप अप सेल्फी कॅमेरा असेल.

Leave a Comment