नवीन वर्ष साजरे करण्याच्या विचित्र परंपरा

bigben
नवीन वर्षाचे स्वागत मित्र, आप्त, परिवारासोबत मस्त पार्टी करून करण्याची प्रथा चांगलीच रुळली असली तरी जगात विविध देशात नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या अनेक मजेदार आणि विचित्र परंपरा आहेत आणि आजही त्या पाळल्या जातात. यामागे वाईट ते जावे, चांगले ते यावे आणि सुखसमृद्धी लाभावी अशी भावना बहुतेक ठिकाणी आहे.

dishes
स्पेनमध्ये नववर्ष सुरु होताना द्राक्षे खाण्याची प्रथा असून एकावेळी १२ द्राक्षे खाल्ली तर खूप लकी मानले जाते. डेन्मार्कमध्ये वर्षभर जुन्या, वापरात नसलेल्या, खराब झालेल्या डिशेस साठवून ठेवल्या जातात आणि नवीन वर्षाच्या स्वागताला भिंतीवर फेकून फोडल्या जातात. आयर्लंड मध्ये भिंतीवर ब्रेड फेकले जातात त्यामागे वाईट शक्तीपासून रक्षण व्हावे अशी भावना असते.

wear
फिलिपिन्समध्ये या दिवशी पैश्याला अधिक महत्व दिले जाते. नाणी गोल आकाराची असतात त्यामुळे या दिवशी गोल आकाराच्या वस्तू वापरण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळे धनवृद्धी होते असा समज आहे. जपान मध्ये या दिवशी मंदिरात १०८ वेळा घंटानाद केला जातो. त्यामुळे १०८ प्रकारच्या चिंतांपासून मुक्ती मिळते अशी भावना आहे. द.अमेरिकेत नवीन वर्षात रंगीत अंडरवेअर घातल्या जातात. प्रेमाच्या शोधात असतील त्यांनी लाल, शांती हवी असेल त्यांनी पांढरी आणि पैसा हवा असेल तर सोनेरी रंगाची अंडरवेअर घातली जाते.

scarecrow
आपण जाणूनबुजून कधीही आईसक्रिम जमिनीवर टाकत नाही. पण नववर्षाच्या स्वागताला स्वित्झर्लंड मध्ये लोक जाणूनबुजून जमिनीवर आईसक्रिम पाडतात त्यामुळे आयुष्यात गुडलक आणि संपन्नता येते असा समज आहे. फ्रांस मध्ये पॅनकेक, फोग्रास आणि शँपेन या पदार्थांची मेजवानी असते तर इक्वाडोर मध्ये गतवर्षात घडलेल्या वाईट घटना, आठवणी कागदावर लिहून ते कागद स्केअरक्रोमध्ये भरून जाळले जातात. वाईट फोटोही असेच जाळले जातात. त्यामागे दुख:दायक आणि वाईट आठवणी जळून जाव्यात अशी भावना असते.

kabarast
चिलीमध्ये नववर्षाच्या रात्री कबरस्तानात झोपण्याची प्रथा आहे. आपल्या जिवलगांच्या कबरीजवळ झोपल्याने त्यांच्या सोबत हा वेळ घालवला जातो. यामुळे मृतांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते.

Leave a Comment