महाराष्ट्रात मंत्रिमंडळात ३६ पैकी ३५ मंत्री कोट्याधीश


होणार होणार असे गाजत असलेला महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाला आणि ३६ नवे मंत्री राज्याला मिळाले. या ३६ मधले २६ कॅबिनेट मंत्री आहेत तर १० राज्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळाचे विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात बहुदा प्रथमच वडील आणि मुलगा मुख्यमंत्री आणि मंत्री बनले आहेत. तसेच ३६ पैकी ३५ मंत्री कोट्याधीश आहेत. सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहेत विश्वजीत कदम. त्यांची मालमत्ता २१६.८ कोटींची आहे तर सर्वात कमी संपत्ती असलेल्या मंत्री आहेत अदिती तटकरे.

विश्वजीत कदम कॉंग्रेसचे आहेत आणि शिक्षणसम्राट अशी त्यांची ओळख आहे. पुणे आणि परिसरात त्यांची अनेक कॉलेज आणि शैक्षणिक संस्था आहेत. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती यांची संपत्ती ३९.१ लाख रुपये आहे आणि त्या मंत्रिमंडळातील आदित्य ठाकरे यांच्यानंतर दोन नंबरच्या तरुण मंत्री आहेत. त्यांना राज्यमंत्रीपद दिले गेले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले गेले असून ते मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री आहेत. त्यांची संपत्ती १७ कोटी रुपये आहे. त्यांनी कायदा विषयातील पदवी घेतली असून त्यांच्या नावावर एकही गुन्हेगारी तक्रार दाखल नाही. आदित्य याना कविता करणे आणि गीतलेखनाची आवड असून त्यांचा एक अल्बम आणि एक कवितेचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Leave a Comment