न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये पडले नव्या वर्षाचे पहिले पाउल

newziland
जगभरात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचा जल्लोस झाला असला तरी न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात नवीन वर्षाचे पहिले पाउल पडले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियातील सिडने येथे नववर्षाची पाउले वाजली. न्यूझीलंडची वेळ भारतीय वेळेपेक्षा ७ तास पुढे आहे. त्यामुळे भारतात जेव्हा साडेचार वाजले होते तेव्हाच न्यूझीलंडच्या ओकलंडमधील घड्याळे रात्रीच्या १२ चे टोल देत होती.

नववर्षाचा जल्लोष होताच स्काय टॉवरवर नेत्रदीपक आतषबाजी साली. जगभरातील पर्यटक हा सोहळा अनुभवण्यासाठी येथे जमतात. यावेळी शेकडो शहरवासीही नववर्षाच्या स्वागतासाठी येथे जमले होते. १२ चे टोल पडताच एकमेकांना शुभेच्छा देण्याची एकच धांदल उडाली. ऑस्ट्रेलियाच्या सिडने येथील ऑपेरा हाउसवर नववर्षाच्या स्वागतासाठी केली जाणारी आतषबाजी जगात प्रसिद्ध आहे. यंदा येथेही लोकांनी खूप गर्दी केली होती.

Leave a Comment