क्रिकेटमध्ये अवतरली कॅमल बॅट


काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिली याने क्रिकेटमध्ये अल्युमिनियमची बॅट वापरून सनसनाटी पसरविली होती. आता पुन्हा एकदा अशीच सनसनाटी कॅमल बॅटमुळे पसरली आहे. रविवारी बिग बॅश लीग मध्ये अॅडलेड स्ट्राईकर्स आणि मेलबर्न रेनेगेडस मध्ये जो सामना झाला त्यात या विचित्र बॅटचे दर्शन घडले. ही बॅट घेऊन आला अॅडलेडचा फलंदाज रशीद खान.

रशीद खान याने ही अनोखी कॅमल बॅट घेऊन मैदानावर प्रवेश केला आणि १६ चेंडूत २५ धावा ठोकल्या. साऱ्यांनी त्यांच्या या कॅमल बॅटचे कौतुक केले. काही उंटांच्या पाठीवर दोन कुबडे असतात तसे या बॅटचे डिझाईन केले गेले आहे. त्यामुळे त्याला कॅमल बॅट नाव पडले आहे. बॅटच्या मागच्या भागात दोन उंचवटे आहेत आणि मधली जागा मोकळी आहे. यापूर्वी अशी बॅट कधीच वापरली गेलेली नही.

रशीदखान हा अफगाणीस्तानचा स्टार क्रिकेटर जगभर क्रिकेट लीग मधून खेळतो. सध्या तो बिगबॅश लीग खेळतो आहे. पुढच्या वर्षी एप्रिल मध्ये सुरु होत असलेल्या आयपीएल मध्ये तो सनरायझर्स हैद्राबादकडून खेळणार आहे. असेही समजते की त्याला सनरायझर्स हैद्राबादने त्याची कॅमल बॅट बरोबर आण असे सांगितले आहे.

Leave a Comment