हे आहे मानवी वस्ती असलेले जगातील सर्वाधिक थंड ठिकाण

Image Credited- Bhaskar

ईशान्य रशियातील साखा जिल्हा (याकुटिया) मानवी वस्ती असलेले जगातील सर्वाधिक थंड ठिकाण आहे. येथे एक ओम्यकॉन नावाचे गाव आहे. सायबेरियाच्या सम बोलीभाषेत ओम्यकॉनचा अर्थ असे पाणी जे कधीच गोठत नाही. मात्र येथे वर्षात बहुतांश दिवस नद्या गोठलेल्याच असतात. ही जागा आर्कटिक सर्कलपासून केवळ 350 किमी लांब आहे. थंडीत येथे सुर्य केवळ 3 तासांसाठी बाहेर येतो. तर उन्हाळ्यात 21 तास दिसतो. एवढ्या थंडीत देखील येथील लोकांचे आयुष्य थांबत नाही. कितीही थंडी असली तरी लहान मुले रोज शाळेत जातात.

सध्या येथील तापमान मायन्स 44 डिग्री आहे. तापमान मायन्स 52 डिग्री खाली गेल्यावर शाळेंना सुट्टी असेल. याकुटियाची लोकसंख्या 3 लाख आहे. येथे शाळा, डाकघर, बँक आणि रनवे देखील आहे. प्रत्येक गावात हॉस्पिटल आणि डॉक्टर आहेत.

थंडीत येथील तापमान मायन्स 58 डिग्री पर्यंत जाते. एवढी थंडी असताना देखील हे एक शानदार पर्यटन स्थळ आहे. येथे कलाकार बर्फाचे पुतळे बनवतात. मॉस्कोवरून कारने येथे पोहचण्यास 2 दिवस लागतात. येथे सर्वात मोठी समस्या मृतांना दफन करण्याची आहे. बर्फाखाली गोठलेली झालेली माती खोदण्यासच अनेक दिवस लागतात. शेकोटी पेटवून माती मऊ करावी लागते.

याकुटियामध्ये कारचे इंधन गोठणे सर्वसामान्य बाब आहे. गिअर अचानक जाम होतात. त्यामुळे जागोजागी हीट गॅरेज आहेत. पेनाची शाई देखील येथे गोठते. लोक प्राण्यांच्या चमड्यांपासून बनवलेले कपडे परिधान करतात. हे जगातील सर्वात थंड ठिकाण असले, अनेक इतर जगापासून तुटलेले असले तरी देखील गरजेच्या सर्व गोष्टी येथे आहेत.

Leave a Comment