पॅट कमिन्स यावर्षीचा सर्वात यशस्वी गोलंदाज


मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्ससाठी यंदाचे वर्ष खास ठरले असून २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज कमिन्स हा ठरला आहे. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये कमिन्सने एकूण ५९ बळी टिपले. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन या यादीत कमिन्सपेक्षा १४ बळींनी पिछाडीवर आहे.

त्याचबरोबर यावर्षी सर्व स्वरुपात मिळून कमिन्स सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने यावर्षी एकूण ९९ आंतरराष्ट्रीय बळी घेतले. त्याने कसोटी सामन्यात ५९, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३१ तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात ९ बळींची नोंद आहे. या यादीत भारताचा मोहम्मद शमी दुसर्‍या क्रमांकावर आहे. ३० आंतरराष्ट्रीय सामने त्याने खेळले असून त्याने त्यात ७७ बळी घेतले आहेत. शिवाय, यंदा शमी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने एकदिवसीय सामन्यात ४२ बळी घेतले आहेत.

कमिन्सने न्यूझीलंडविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. तो आयपीएलच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरल्याने त्याचे हे वर्ष अजून उत्तम गेले. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला १५.५ कोटी रुपये मोजून संघात घेतले आहे.

Leave a Comment