विराट शोधत असलेला ‘वंडर किड’ घेणार गांगुलीच्या अकादमीत प्रशिक्षण

Image Credited – Jagran

प्रतिभेला वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते. हीच गोष्ट खरी केली आहे 3 वर्षीय शेख शाहिदने. या लहान बाळाने दोन वर्ष वय असतानाच सचिन-विराट प्रमाणे शानदार क्रिकेटिंग शॉट्स मारण्यास सुरूवात केली आहे. या चिमुकल्याच्या फलंदाजीला विराट कोहलीने देखील अद्भूत म्हटले आहे. तर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने त्याला भारतीय संघात घेण्यात यावे असे म्हटले. क्रिकेटच्या या वंडर किडची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

दक्षिण कोलाकात्याच्या मूचीपाडा येथे राहणाऱ्या शाहिदचे वडील शेख शमशेर यांनी सांगितले की, एकेदिवशी मी घरात टिव्हीवर ऑस्ट्रेलिया-भारतामधील सामना पाहत होतो. शाहिद त्यावेळी 2 वर्षांचा होता. त्यावेळी तो अचानक मला म्हणाला की, मला देखील क्रिकेट खेळायचे आहे. मी त्याला प्लास्टिकची बॅट आणि बॉल घेऊन दिली. त्याने जेव्हा शॉट्स मारले, तेव्हा मी देखील आश्चर्यचकित झालो. तो हुबेहुब एखाद्या क्रिकेट प्रमाणे खेळत होता. विचारल्यावर त्याने सांगितले की, टिव्हीत जसे पाहिले तसेच केले. पुढील 6 महिने त्याला घरात त्याचा सराव केला व अडीच वर्षांचा झाल्यावर क्रिकेट अकादमीमध्ये भरती केले.

शमशेर यांनी सांगितले की, त्याला घेऊन स्वामी विवेकानंद स्कूल ऑफ क्रिकेटमध्ये गेलो. तेथे एवढ्या छोट्या मुलाला भरती करण्यास नकार दिला. जोर दिल्यावर त्यांनी आधी टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला. शाहिदने पहिल्याच बॉलवर असा शानदार शॉट्स मारला की कोच देखील दंग झाले. तेव्हापासून तेथेच त्याचे प्रशिक्षण सुरू आहे.

शाहिदचे वडील सॅलूनच्या दुकानात काम करतात. त्यांना महिन्याला 6 ते 8 हजार रुपये मिळतात व त्यातून त्यांचे घर चालते. 3 वर्षीय शाहिदला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षणाचे आश्वासन मिळाले आहे.

फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेले प्रशिक्षक अमित चक्रवर्ती देखील म्हणाले की, शाहिदमध्ये विलक्षण प्रतिभा आहे.

सौरव गांगुलीने 15 डिसेंबरला लंडनवरून साल्टलेक येथील आपली क्रिकेट अकादमी व्हिडीओकॉन 22 यार्ड्सचे संचालक संजय दास यांना फोन करून शाहिदबद्दल माहिती घेतली. त्यानंतर संजय दास यांनी शाहिदचे कोच अमित चक्रवर्ती यांना फोनवर सांगितले की, आर्थिक परिस्थितीमुळे अशी प्रतिभा वाया जाऊ नये म्हणून गांगुली यांच्या अकादमीमध्ये स्पॉन्सरशीप देण्यात येईल.

या आधी देखील सोशल मीडियावर शाहिदचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याच्या प्रतिभेचे कौतूक केले आहे.

Leave a Comment