मुलगी हिंदूंप्रमाणे आरती करत असल्याने आफ्रिदीने फोडला होता टिव्ही

Image Credited – Deccan Chronicle

दानिश कनेरियाचे प्रकरण समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये हिंदूंसोबत  भेदभाव होत असल्याचा खुलासा झाला होता. मात्र आता पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात त्याने असे वक्तव्य केले आहे, ज्याने पाकिस्तानच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्न निर्माण झाले आहे. एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आफ्रिदीने खुलासा केला आहे की, एकदा त्याची मुलगी आरती करत असताना पाहून त्याला खूपच राग आला व त्याने रागात टिव्हीच फोडला.

आफ्रिदीने पाकिस्तानी चॅनेल एआरवाय न्यूजला मुलाखत दिली आहे. जेथे त्याने कार्यक्रमाची अँकर निदा नासिरला सांगितले की, कसे त्याने आपल्या मुलीला आरती करताना पाहून रागाच्या भरात टिव्हीच फोडला होता. आफ्रिदीने खुलासा केला की, त्याची मुलगी भारतीय टिव्ही शो बघितल्यानंतर आरतीची थाळी घेऊन फिरवत होती. जे पाहून त्याला खूपच राग आला व  त्याने रागात टिव्हीच फोडला. आफ्रिदीच्या या खुलाशानंतर अँकर व इतर लोक हसू लागतात.

दरम्यान, आफ्रिदीचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ 2017 चा आहे. मात्र दानिश कनेरिया प्रकरणानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज दानिश कनेरियाने काही दिवसांपुर्वी खुलासा केला होता की, हिंदू असल्याने पाकिस्तानी क्रिकेट संघातील काही खेळाडू त्याच्याशी भेदभाव करायचे.

Leave a Comment